Subscribe Us

मान्सून 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होणार! -IMD


मान्सूनकडे (Monsoon) डोळे लागून बसलेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात रेंगाळणारा मान्सून आता पुढे सरकला आहे. पुढील ४८ तासांत बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या काही भागांवर पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. पुढील 48 तासात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. IMD च्या अंदाजानुसार, आता 1 जूनपर्यंत केरळमध्ये मान्सूनचे आगमन होईल असे सांगितले जात आहे. त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात होईल, जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात ( Maharashtra) मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश भागांत पावसाळी वातावरण होत आहे. त्यामुळे वातावरण ढगाळ राहणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या