विशेष प्रतिनिधी: मागील 150 दिवसांहून अधिक काळ सुरू असलेलं ST कर्मचाऱ्याचं आंदोलन St Strike आता संपण्याच्या वाटेवर असल्याचं दिसतं आहे. ST कर्मचारी आता हळू-हळू कामावर परतायला सुरूवात झाली आहे. काल मंगळवारी चे 16 हजार 154 ST कर्मचारी St Workers कामावर रुजू झाले आहेत. रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये चालक आणि वाहकांची संख्या जास्त आहे. तर, आतापर्यंत एकूण कर्मचाऱ्यांपैकी 76% कर्मचारी कामावर आले आहेत. एकूण 81,683 कर्मचाऱ्यांपैकी 61 हजार 647 कर्मचारी कामावर रुजू झाले असल्याने लवकरच ग्रामीण Rural भागाचा श्वास म्हणून ओळखली जाणारी ही लालपरी St Bus पुन्हा एकदा संपूर्ण क्षमतेने सुरू होईल.
0 टिप्पण्या