मुंबई: दहावी-बारावीच्या निकालाची तयारी युध्दपातळीवर सुरु असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व उत्तरपत्रिका संबंधित विभागीय कार्यालयाकडे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. ३० एप्रिल ते ५ मेपर्यंत सर्व उत्तरपत्रिका त्याठिकाणी जमा होतील. त्यानंतर १० जूनपूर्वी बारावीचा तर २० जूनपूर्वी दहावीचा निकाल जाहीर होईल, त्याचबरोबर जुलै अखेरीस पुरवणी परीक्षा होईल, असे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन पध्दतीने पार पडली. राज्यातील जवळपास ३१ लाख विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा दिली.
0 टिप्पण्या