मुंबई : सेवेची १२ व २४ वर्षे पूर्ण केलेल्या राज्यातील तब्बल ९० हजारांहून अधिक शिक्षकांना Teachers वरिष्ठ वेतन आणि निवड श्रेणीसाठी १५ मेपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (NCERT) प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण १४ जूनपर्यंत चालणार आहे. कोरोनामुळे शालेय शिक्षण विभागाकडून गत दोन वर्षांत निवड व वरिष्ठ श्रेणीचे प्रशिक्षण आयोजित केले नव्हते.
शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी येत्या मे महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ घेण्यासाठी आधी प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण करणे आवश्यक आहे. करोनासह इतर काही कारणास्तव मागील काही वर्षांमध्ये हे प्रशिक्षण झालेच नव्हते. प्रशिक्षणच होत नसल्यामुळे शिक्षकांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. विविध शिक्षक संघटनांनी प्रशिक्षणाचा विषय मार्गी लावण्याचा आग्रह थेट शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडेच धरला होता. शासनाकडून प्रशिक्षणास ग्रीन सिग्नलही मिळाला आहे. त्यानुसार विद्या प्राधिकरणाकरणाने डिसेंबरमध्ये शिक्षकांची ऑनलाइन नोंदणी करून घेतली. तज्ज्ञांकडून प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार केला असून त्याची तपासणी करण्यासाठी विशेष समितीही नियुक्त केली आहे. प्रशिक्षणासाठी ई-कन्टेंट तयार केला आहे.
0 टिप्पण्या