मुंबई: हवामान Weather विभागाने २२ ते २५ एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाचा rainfall अंदाज वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात याचा मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला असून विदर्भ मात्र कोरडा आहे. परंतु हवामान खात्याने २२ ते २५ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने म्हटले आहे कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जेनेसह विजेच्या कडकडाट होईल. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा तसेच द्राक्ष, आंबा यांना फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस झाल्यास या भागांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते म्हणून बळीराजा चिंतेत आहे.
0 टिप्पण्या