Subscribe Us

QR Code स्कॅन करताय ? सावधान होऊ शकते फसवणूक!

 

सध्याच्या काळात ऑनलाईन व्यवहारांचा ट्रेंड खूप वाढत असून आता अनेक लोक ऑनलाईन व्यवहारांवर करत आहेत. यासाठी ते अनेक ई-पेमेंट पद्धती वापरतात. ऑनलाईन व्यवहार करायला सर्वांनाच आवडते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. QR कोडच्या मदतीने वापरकर्त्यांना जाळ्यात अडकवलं जात आहे. लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि बँकिंग माहिती चोरी केली जाते. अलीकडेच QR Code द्वारे ऑनलाईन फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आले आहेत. अशावेळी लोकांना क्यूआर कोडद्वारे पैसे मिळवून देण्याचा मोह दाखवला जातो. याउलट पैसे मिळण्याऐवजी क्यूआर कोड स्कॅमद्वारे लोकांच्या बँक खात्यातून पैसे काढले जातात.

• ऑनलाईन फसवणुक टाळण्यासाठी खालील उपाय करा.

> UPI आयडी किंवा Bank Details कोणत्याही व्यक्तीला देऊ नका.

> तुम्हाला अनोळखी व्यक्तींकडून मिळालेला QR कोड स्कॅन करू नका.

> OTP कुणालाही शेअर करू नका. कारण, तो गोपनीय आहे आणि तो वापरुन तुमची कोणतीही माहितीवर ताबा घेता येऊ शकतो.

> जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत ऑनलाईन व्यवहार करता किंवा पैसे पाठवता किंवा प्राप्त करता तेव्हा एकदा त्या अनोळखी व्यक्तीची सत्यता तपासा.

> तुम्ही OLX किंवा इतर साईट्सवर काही विकत असाल, खरादी करत असाल तर प्लॅटफॉर्मवर खरेदीदाराची सामील होण्याची तारीख तपासा. त्याची प्रोफाईल फोटो, नाव, फोन नंबर ही माहिती तपासा. जर एखाद्या वापरकर्त्याने त्या खरेदीदाराचे खाते अलीकडेच नोंदवले असेल, तर OLX त्यासंबंधित माहिती दाखवेल.

> तुमचे सर्व UPI आयडी एका कोडने सुरक्षित करा. Phonepe, BHIM, Google Pay, Amazon Pay सारखे सर्व UPI Payment Providers युजर्सना सुरक्षा पिनद्वारे UPI सुरक्षित ठेवण्याचा पर्याय देतात. जेव्हा जेव्हा युजर्स हे Apps उघडतात तेव्हा सर्वप्रथम हा सुरक्षा कोड टाकावा लागतो. यामुळे, UPI सुरक्षित राहतो.

-Copyright © Bhushan Mahale 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या