Subscribe Us

महाराष्ट्र शिक्षक पॅनल राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 ध्रुवास राठोड व विलास निकम यांना जाहीर

महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक/ शिक्षिका सेवा सन्मान पुरस्कार 2022 साठी जळगाव जिल्ह्यातील श्री ध्रुवास ममराज राठोड-अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा डेराबर्डी,चाळीसगाव तसेच श्री. विलास अरुण निकम-जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा लोहारा तालुका पाचोरा  यांना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल तसेच  राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनल निवड समितीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 15 मे 2022 रोजी सिनेसृष्टीतील कलावंत, शिक्षक आमदार तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अंकुशराव लांडगे सभागृह पुणे येथे वितरित करण्यात येणार आहे. सदरील पुरस्कार निवड महाराष्ट्र शिक्षक पॅनल जळगाव जिल्हा निवड समिती प्रमुख श्री पंकजकुमार पालीवाल व रावसाहेब राऊळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.

काल दिनांक 05 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील साहेब, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक श्री राजेंद्र सपकाळे साहेब, लोहारा केंद्रप्रमुख किशोर पाटील, ज्ञानेश्वर जाधव सर,जळगाव जिल्हा निवड समिती प्रमुख श्री पंकजकुमार पालीवाल व रावसाहेब राऊळ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये निवड पत्र देण्यात आले. सर्वांना 15 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे रीतसर निमंत्रण देण्यात आले.

महाराष्ट्र शिक्षक पॅनल या व्हाट्सअप ग्रुप ने 160 ग्रुपच्या माध्यमातून साधारणतः 25 हजाराहून अधिक शिक्षकांना एकत्र आणून मागील अनेक वर्षापासून शैक्षणिक चळवळ चालविली आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक शिक्षकांपर्यंत नवनवीन माहिती पोहोचविणे त्याचबरोबर एखाद्या  गुरुजनाचा अनोखा उपक्रम संपूर्ण राज्यातील इतर गुरुजनापर्यंत पोहोचविणे हे कार्य अविरतपणे हे पॅनल करीत आहे. 

लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य टिकवून ठेवण्याचे मोलाचे कार्य या पॅनलने केले आहे.सोबतच राज्यातील गुणी गुरुजनांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन देखील ही टीम स्वतःच्या खर्चाने पार पाडते. महाराष्ट्र शिक्षक पॅनल च्या कार्याचे राज्यातील सर्व शिक्षक व अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या