अमळनेर: मंगळग्रह देव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. त्याकार्यक्रमात आमदार अनिल पाटील अध्यक्षस्थानी असतील. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.श्री मंगळदेव ग्रह (Mangal grah temple amalner) मंदिरात श्री भूमिमातेची मूर्ती स्थापित झाली आहे. त्या निमित्ताने या चैत्र मासातील नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आज 9 एप्रिल पासून शतचंडी महापूजेस प्रारंभ झालाय.11 रोजी महापूजेची समाप्ती होईल. या तिन्ही दिवशी रोज वेगवेगळे 11 मानकरी सपत्नीक ही महापूजा करतील. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले मुख्य यजमान असतील. केशव पुराणिक मुख्य पुरोहित असतील. दि.11 रोजी संतश्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते पूर्णाहुती होईल. याचेच औचित्य साधून मंगळग्रह सेवा संस्थेने दि.11 रोजी विविध विकासकामांची उद्घाटने, मंदिराच्या तथा संस्थेच्या नव्या माहिती पुस्तिकेचे लोकार्पण , काही मान्यवरांचा सत्कार व पैलाड येथील पोलीस चौकीच्या नवनिर्माणाचे भूमिपूजन असे कार्यक्रम ठेवले आहेत. तरी या महापुजेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे मंदिर समितेने आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या