Subscribe Us

मंगळदेवग्रह मंदिरात शतचंडी महायागपूर्णाहुती संपन्न!

अमळनेर : येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात विश्वातील एकमेव भूमी मातेच्या मूर्तीची नुकतिच स्थापना झाली आहे. त्या प्रित्यर्थ चैत्र नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून मंदिरात तीन दिवसीय शतचंडी महायज्ञ करण्यात आला. संत सखाराम महाराज संस्थानचे गादीपती प्रसाद महाराज यांच्याहस्ते ११ एप्रिल रोजी पूर्णाहुती झाली. यावेळी आमदार अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले तीन दिवसीय महायज्ञाचे मुख्य यजमान होते. या महायज्ञासाठी रोज ११ भाविक सपत्नीक पूजेचे मानकरी होते. 

दिननिहाय मानकऱ्यांची नावे अशी - ९ एप्रिल २०२२ रोजी प्रथम दिनी जगदीश गुरव, प्रकाश वाध व योगेश देशमुख (जळगाव), धनराज चौधरी, दत्तात्रय कोळपकर, प्रवीण देशमुख, सीए आकाश वर्मा, प्रा. सुरेश पाटील, रोहित सोनार, दिनेश नाईक (सर्व रा. अमळनेर), १० एप्रिल रोजी प्राचार्य विजय बहिरम, पंकज मराठे व प्रसाद भंडारी (अमळनेर), अविनाश पाटील, ओंकार उदावत, सौरभ धूत (नाशिक), किरण पाटील व मधुकर सावंत (जळगाव), श्रीकांत कदम (यवतमाळ), जगदीश नरवाडे (माहूर), तर ११ एप्रिल रोजी निवृत्त पोलिस उपअधीक्षक श्यामकांत सोमवंशी (जळगाव), राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, अतुल निकुंभ, संजय अग्रवाल, आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक प्रेमसिंग सोळंके (अमळनेर), सतीश अग्रवाल व राजेश वाणी (धुळे), शरद सोनवणे व राजेंद्र सोनवणे (पारोळा), चोपडा येथील काँग्रेसचे शहराध्यक्ष संजीव बाविस्कर, आनंद महाले (मुंबई) हे होते.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या