एसटी कर्मचाऱ्यांनी आज दुपारच्या सुमारास शरद पवारांच्या सिल्वर ओक (Silver Oak Sharad Pawar residence) या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला असून 104 कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर अटकेची कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जमावाला भडकवणे, कट रचणे या गुन्ह्या अंतर्गत वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीनंतर पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली आहे.
थोड्याच वेळात गुणरत्न सदावर्ते यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती असून उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. 'माझी हत्या होऊ शकते', गुणरत्न सदावर्ते यांचा गंभीर आरोप मुंबई पोलिसांनी ताब्यात घेताच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी मला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. माझ्या पत्नीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
0 टिप्पण्या