अनेक लोक बस स्थानकावर येतात, पण ग्रामीण भागासाठी बस सुरु करण्यात आलेल्या नाहीत. लोक येतात व निराश होऊन खाजगी वाहनाने जास्त पैसे देऊन प्रवास करतात. कारण वय वर्ष ६० व पुढील लोकांना बसमध्ये अर्धे टिकीट लागते. बारावीचा शेवटाचा पेपर आज होता. शाळेतील इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. रोज काम किंवा नोकरीनिमित्त तसेच शिक्षणासाठीही लोक शहरात येत असतात. याआधी प्रत्येक गावाला मुक्कामी बस जायची कारण सकाळी लवकर शहरात येणारे लोक या बसचा फायदा घेतील व शहरातुन लवकर घरी परततील. रात्री घरी जाण्यास उशीर झाल्यास जास्त पैसे द्यावे लागत असतात त्यामुळे बसेस अभावी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
तरी लवकरात लवकर ग्रामीण भागासाठी बसेस सुरु करण्यात याव्यात. अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
0 टिप्पण्या