Subscribe Us

गिरीश धोंगडे ची ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'बालकवी' म्हणून निवड

उस्मानाबाद प्रतिनिधी: उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उस्मानाबादच्या ग्रीनलँड हायस्कूलमधील इयत्ता ७ वीतील गिरीश संजय धोंगडेची 'बालकवी' म्हणून बालकुमार मेळाव्यात 'बालकांचे काव्यवाचन ' साठी संयोजन समितीने निवड केली आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित महाराष्ट्र उद्यगिरी महाविद्यालय उदगीर येथे दि. २२,२३ व २४ एप्रिल २०२२ या कालावधीत अ.भा.म.साहित्य महामंडळाचे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनामध्ये बालकुमार मेळावा दि.२३ व २४ एप्रिल २०२२ रोजी आयोजित केला आहे.यात बालकवी म्हणून गिरीश धोंगडेची संयोजन समितीने निवड केलेली आहेअसे पत्राद्वारे संमेलन कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर आणि प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरूके यांनी कळविले आहे.
गिरीश धोंगडे ला ५०० रू.मानधन आणि संमेलन काळात तीनही दिवस भोजन -निवासाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. या निवडीबद्दल गिरीशचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या