Subscribe Us

शेगाव येथील श्री गजानन महाराज यांचं मंदिर तब्बल 2 वर्षानंतर भाविकांसाठी खुले!

शेगाव प्रतिनिधी: शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या (Shri Gajanan Maharaj) समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक शेगावच्या पुण्यनगरीत येतात. कोरोना काळानंतर आज प्रथम श्री गजानन महाराजांचे मंदिर सर्वांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. त्यामुळे शेगावात आजपासून भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. तर कोरोना काळानंतर आज मंदिर खुले होण्याचा पहिलाच दिवस असल्याने भाविकांची शेगावात (Shegaon) सकाळपासूनच गर्दी होत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ई पास (E-Pass) लागत होती, आणि कोरोनांचे नियम पाळून दर्शन होते, मात्र आजपासून मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आल्याने आता पासची आवश्यकता नाही. आणि थेट मंदिरात प्रवेश मिळत आहे. मंदिर प्रशासनाकडूनही दर्शनासाठी येणारऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पोलिसांची सुरक्षा सुद्धा तैनात आहे.


 तब्बल दोन वर्षांच्या कोरोना (Covid) व लॉकडाउन (Lockdown) कलखंडानंतर आज शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर पूर्णपणे निर्बंधमुक दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे, आज सकाळी निर्बंधामुक्त व कुठल्याही पास शिवाय दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. दोन वर्षानंतर सामान्य भक्तांना आज मंदिरात प्रवेश मिळत असल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या