जामनेर प्रतिनिधी: तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वडाळी दिगर शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सुरेश शिनगारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सदस्य राहुल शिनगारे,अमोल शिनगारे उपस्थित होते. यावेळी शिक्षकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली व विद्यार्थ्यांनी देखील लक्षपूर्वक माहिती समजून घेतली.मुख्याध्यापक निलेश भामरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपशिक्षक संदिप पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय तत्त्वज्ञ, कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक होते. त्यांनी दलित चळवळीला प्रेरणा दिली आणि सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
0 टिप्पण्या