मुंबई: कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने मागील महिन्यात महाराष्ट्र सरकारने (Maharashtra State Government) कोरोनावरील सर्व निर्बंध हटवले. मात्र आता भारतात पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून (Central Government) महाराष्ट्रासह 5 राज्यांना सावधानतेच्या इशारा दिला आहे. यानंतर आता पुन्हा महाराष्ट्रात निर्बंध (Maharashtra Corona Restrictions) लागणार का? मास्क सक्ती होणार का? अशा चर्चा होत असतानाच यावर राज्याचे आरोग्यमंत्री (Maharashtra Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ”महाराष्ट्रात तूर्तास नोंद घ्यावी अशी रुग्णसंख्या वाढलेली नाही. महाराष्ट्रात सध्या आढळणारी रुग्णसंख्येची गंभीर नोंद घ्यावी अशी नाही, त्यामुळे पुन्हा निर्बंध लावणं किंवा मास्कसक्तीचा (Mask) कोणताही विचार नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Corona Restrictions)
पुढे बोलताना टोपे म्हणाले, ”मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य विभागातर्फे निरिक्षण केले जात असून गरजेप्रमाणे पावले उचलली जात आहेत आणि सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका आहे. घाई करण्याची कोणतीही गरज नसल्याचं ते म्हणाले.”
0 टिप्पण्या