Subscribe Us

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री!

 

मुंबई: दिल्लीसह काही राज्यात कोरोनाने (coronavirus) धुमाकुळ घालायला सुरूवात केली असताना आता मुंबईतूनही कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. मुंबईत (Mumbai) कोरोना रूग्णांच्या संख्येत (corona-cases) पुन्हा वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईत कोरोना रूग्णसंख्या दुपटीने वाढत असून गेल्या 57 दिवसांत पहिल्यांदाच मुंबईत 100 पेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. बीएमसीच्या (BMC) आकडेवारीनुसार मुंबईत 102 नवे रूग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली. यावेळी किमान बंद असलेल्या ठिकाणी मास्क बंधनकारक करा, अशी मागणी टास्क फोर्सकडून (task force) करण्यात आली आहे. तर राज्यातील कोरोना चाचण्यांवर भर देण्याच्या सूचना देखील टास्क फोर्सकडून देण्यात आल्या आहेत. अनेक राज्यात मास्क पुन्हा बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही पुन्हा मास्कसक्ती होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी)PM Narendra modi) व राज्यातील मुख्यमंत्र्यांमध्ये कोरोनाबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार असून यात काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या