Subscribe Us

मोठी बातमी! MHT CET परीक्षा पुढे ढकलली!


मुंबई: विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्तवाची बातमी आहे. सीईटी ची (CET 2022) परीक्षा लांबणीवर गेली आहे. जीईई (GEE) आणि नीटच्या (Neet) परीक्षांमुळे सीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी याबातची माहिती दिली आहे. (cet 2022 exams postpone)

नक्की कारण काय?

तंत्र शिक्षण विभागाकडून होणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचं आयोजन हे 3-10 जून दरम्यान करण्यात आलं होत्या. मात्र जीईई (GEE) आणि नीटच्या (NEET) प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटीचं आयोजन हे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलं आहेत. त्यामुळे सीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच लवकरच वेळापत्रक जाहीर करु, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

दरम्यान काही दिवसांआधी जीईई च्या परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जीईई परीक्षेच्या कालावधीदरम्यानच नीटच्या परीक्षा होत्या. त्यामुळे अभ्यासासाठी आणि विविध कारणांमुळे सीईटीची परीक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला होता. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने या मागणीची दखल घेतली. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या