जळगाव प्रतिनिधी: दि. २० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ यांचे गेल्या दोन वर्षापासून मानधन थकीत या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये काही विनाअनुदानित शाळा तिल शिक्षक देखील कार्यरत आहेत. तेव्हा सदरील बी एल ओ यांना थकित मानधन लवकरात लवकर मिळावे यासाठी निवेदन खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जळगाव तालुका यांच्या वतीने श्री अशोक मदाने राज्य उपाध्यक्ष यांच्या हस्ते माननीय नामदेव पाटील साहेब तहसीलदार जळगाव यांना देण्यात आले. सदर मानधन मिळण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून सदर मानधन लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न केला जाईल यासाठी माननीय तहसीलदार साहेब श्री नामदेव पाटील व नायब तहसीलदार श्री चंदनकर साहेब यांनी आश्वस्त केले. याप्रसंगी पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या बी एल ओ ना कार्यमुक्त करणेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मतदान कार्ड व मतदार यादी यामध्ये असलेल्या अचूक माहिती भरल्यानंतर ही येणाऱ्या चुकीच्या पत्ता मुळे बी एल ओ यांना येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली.
सदर प्रसंगी राज्य उपाध्यक्ष श्री अशोक मदाने श्री टी के पाटील राज्य सदस्य अजित चौधरी गोविंदा लोखंडे प्रफुल्ल सरोदे पद्माकर चौधरी निलेश मोरे तालुकाध्यक्ष राहुल चौधरी तालुका सचिव केतन बराटे उपाध्यक्ष सोमनाथ लोखंडे सहसचिव कैलास थोरवे संघटक विनोद शेलवडकर प्रसिद्धीप्रमुख सागर झांबरे हिशोब तपासणीस निखिल जोगी जाकिर सय्यद जुबेर अहमद जाकिर अहमद सागर पाटील स्वप्नील पाटील स्वप्नील खंबायत स्वप्नील जयस्वाल सचिन परदेशी हे सदस्य उपस्थित होते.
0 टिप्पण्या