Subscribe Us

मोठी बातमी! उद्यापासून बँकांच्या वेळात बदल

 

गेल्या चार दिवसांपासून सलग सुट्या असल्यामुळे बँक bank ग्राहकांची अनेक कामे रेंगाळली आहेत. याची दखल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Reserve Bank of India घेतली आहे. म्हणूनच उद्यापासून बँकांच्या वेळेत रिझर्व्ह बँकेने RBI बदल करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्यापासून बँकांचे कामकाज एक तास अधिक चालणार आहे. कोरोना संकटामुळे बँकांच्या वेळात बदल करण्यात आला होता.

मात्र, आता पुन्हा पूर्वीप्रमाणेच बँकांच्या वेळा करण्यात आल्या आहेत. बँका आता सकाळी ९ वाजता उघडतील. म्हणजेच, सकाळी ९ वाजता बँकेचे कामकाज सुरू होईल. त्यामुळे सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. यामुळे बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या