Subscribe Us

अमळनेर येथील दाम्पत्याची ३लाख ८५ हजारांत ऑनलाईन फसवणूक; जळगावसायबर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

 


अमळनेर (प्रतिनिधी) अज्ञात इसमाने बँकेच्या खात्याशी आधारकार्ड लिंक करून ऑनलाईन थंब इंप्रेशनव्दारे अमळनेर येथील दाम्पत्याची ३ लाख ८५ हजार २१० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी आधारकार्ड धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात उज्वला अतुल शिंदे (वय ४६, रा. पिंपळे रोड, अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे व त्यांचे पती अतुल शिंदे यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडीया, बाजारपेठ शाखा, अमळनेर येथे खाते होते. या खात्याला कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या संमती शिवाय परस्पर त्याचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंककरुन त्याद्वारे दि.01 जून 2020 ते दि. 12 एप्रिल 2021 पावेतो वेळोवेळी ऑनलाईन थंब इंप्रेशनव्दारे 3,85,210 रुपये इतकी रक्कम काढुन घेतली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी आधारकार्ड धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या