Subscribe Us

St कर्मचारी भडकले ! शरद पवारांच्या निवासस्थावर दगडफेक !

संपकरी एसटी कर्मचारी प्रचंड भडकले असून त्यांनी Sharad pawar शरद पवारांचे मुंबईचे निवासस्थान सिल्वर ओक वर धडक मारून दगडफेक आणि चप्पल फेक केली आहे. यामुळे परिसरामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून तात्काळ खासदार सुप्रिया सुळे या बाहेर आल्या आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना मी तुमच्याशी शांततेत बोलायला तयार आहे. माझी विनंती आहे तुम्ही माझ्याशी शांततेत चर्चा करा या गोंधळाच्या परिस्थितीत चर्चा करता येणार नाही. अशी विनंती केली.


परंतु, एसटी St strike कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्याही स्थितीत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम होते. त्यांचा एक नेता पाटील यांना पोलिसांनी पकडून व्हॅनमध्ये घालून नेले. त्याला सोडवण्यासाठी कर्मचारी जास्त आक्रमक झाले. त्यांच्यासमवेत यावेळी कुटुंबीय देखील होते. Supriya Sule सुप्रिया सुळे यांनी वारंवार विनंती करूनही कर्मचारी त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या