Subscribe Us

18 एप्रिल 2022 आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या!

 

कामगार न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप St Strike बेकायदा ठरवला होता. कामावर गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन Salary देता येणार नसल्याचेही सांगितले. त्यामुळे 'नो वर्क, नो पे' (No work, no pay) या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी महामंडळाकडून केली जाणार आहे. असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.


गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे मंत्री नवाब मलिक  Navab malik यांच्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. नवाब नलिकावर झालेल्या (Ed) कारवाईनंतर विरोधकांनी मलिकांना चांगलंच निशाण्यावर घेतले जात आहे. नवाब मलिक मनी लॉर्डिंग प्रकरणी
अद्यापही मलिकांना दिलासा मिळालेला नाहीये. आता पुन्हा मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मलिकांना सुनावलेली कोठडी आज संपत आली होती. आता ही कोठडी 22 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली जाते.


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या दहावी-बारावीच्या परीक्षा पद्धतीत बदल केला आहे. यंदा कोरोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा दोन सत्रांत घेण्यात आल्या होत्या. मात्र पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावी-बारावीसाठी सत्र परीक्षा पद्धती लागू नसणार, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. वर्ष 2022-23 पासून बोर्डाच्या परीक्षा वर्षाच्या शेवटी एकदाच घेतल्या जाणार आहेत.
सीबीएसई बोर्ड पूर्वीप्रमाणे एक परीक्षा पद्धती पुन्हा आणण्याचा विचार करीत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या जात आहेत. डिसेंबरमध्ये पहिली सत्र परीक्षा घेण्यात आली आता 26 एप्रिलपासून दुसरी सत्र परीक्षा ऑफलाइन Offline पद्धतीने होणार आहे.


राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे राज्यातील सर्व शाळांमधील पुस्तकांबाबत books नवीन नियम लागू करण्याचा निर्णय ठाकरे Thakare सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्याच्या पाठिवरचे ओझे कमी होणार आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारकडून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता पहिलीसाठी राज्यातील सर्व शाळामध्ये नियम लागू होणार आहेत. त्याचबरोबर इयत्ता दुसरीसाठी 101 तालुक्यात एकात्मिक पुस्तके लागू होणार आहेत. या नव्या शैक्षणिक वर्षासाठी Educational year राज्य सरकारकडून सर्व तयारी सुरु आहे. दरम्यान, या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांच्या पाठीवरचा पुस्तकांचा भार कमी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या