Subscribe Us

नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे अभिनंदन व सत्कार

 

प्रतिनिधी: नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळेतील शिक्षक कर्मच्याऱ्यांची वैद्यकीय देयके मंजूर होणेस खूप मोठा कालावधी लागत होता. संबंधित कर्मचारी हा बाहेरून उसनवार पैसे घेवून आपले वा आपल्या परिवारावर आलेल्या आरोग्य दृष्ट्या संकटाचा सामना करत असे. त्या नंतर सदर देयके खूप उशिराने मंजूर होत असे. अनेक प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करून शिक्षण विभागा मार्फत सदर देयकांचा प्रवास वाढत होत असे. सदर जाचास आपले जि प शिक्षक कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कंटाळले होते. व काहींनी तर वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके मागणी करणे देखील बंद केले होते.

परंतु त्या नंतर डॉ.युनुस पठाण यांची नियुक्ती जिल्हा समन्वयक म्हणून केली असता, तात्काळ त्यांनी एक नविन मुख पत्र तयार करून वैद्यकीय देयकाचा अनावश्यक प्रवास कमी केला. तसेच कामाची एक विशिष्ट प्रणाली तयार करून दिली. त्या नंतर काही काळापासून सदर देयके मंजूर होण्याची प्रक्रिया ही जलद गतीने होत असले बाबत संघटनेच्या निदर्शनास आली. शिक्षण विभागातून तात्काळ प्रकरणे निकाली निघत आहेत. व त्यामुळे कर्मच्याऱ्यांचे आर्थिक संकट लवकर दुर होत असल्याचे दिसून आले. सदर वैद्यकीय देयके मंजूर झाल्याने त्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. करीता संबंधित लिपिकांचे, कार्यालयीन अधीक्षकांचे तसेच नवनियुक्त शिक्षणाधिकारी महोदय यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. आजअखेर कामे वेळेवर होत नाही म्हणून कर्मच्याऱ्यांच्या वतीने संघटना तक्रार करत असायची. परंतु आज प्रथमच प्रशासना मार्फत चांगले सहकार्य मिळत असल्याने नक्कीच संबंधित शिक्षण विभाग अभिनंदनास पात्र ठरला आहे. 

मा.डॉ.युनुस पठाण यांनी शिक्षणाधिकारी पदाचा पदभार महिन्या भरापुर्वीच स्विकारला व नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात न घडलेली निवड श्रेणी ची प्रक्रिया जलद गतीने सुरु झाली व पहिल्यांदाच त्याचा लाभ शिक्षकांना होईल. वर्गखोली बांधकाम, वर्गखोल्या निर्लेखन, NPS बाबत हिशोब, सानुग्रह अनुदान बाबत कार्यवाही, विद्यार्थी लाभाच्या योजना, गुणवत्ता विकास साठी विविध कार्यक्रम, शिक्षकांची विविध प्रलंबित प्रकरणे निकाली निघणे, तसेच विभागातील कर्मचारी यांच्याकडून प्रेमाने कामे करून घेणे, सर्वात महत्वाचे म्हणजे आलेल्या कर्मचारी व शिक्षकांशी आदराने बोलणे, अशा अनेक बाबी सध्या शिक्षण विभागात घडत असल्याचे दिसून येत आहे.

    आजच्या या कार्यक्रमा प्रसंगी संदिप रायते, राहुल पवार, मंगेश वाघमारे, दयानंद जाधव, शिवशंकर देशमुख, भगवान व्यवहारे, ओमशेखर काळा, भूषण चौधरी आदि पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या