शिक्षक पात्रता परीक्षेचा २०१९-२० या वर्षांचा निकाल लागल्यानंतर शिक्षण परिषदेने तब्बल एक वर्षांने २८४ जणांना उत्तीर्ण ठरवून त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी विभागीय कार्यालयांना पत्र पाठविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढलेला नाही. तर राज्यात आज १३,८४०नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. तर ८१ जणांचा आज मृत्यू झाला असून २७,८९१ रग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
SBI ग्राहकांना आता 2 ते 5 लाख रुपयापर्यंत बँकेतून पैसे पाठवण्यासाठी 20 रुपये अधिक GST भरावा लागेल. बँक ऑफ बडोदा ग्राहकांनी आता चेक दिल्यानंतर त्या चेकशी संबंधित माहिती बँकेला पाठवावी लागणार आहे. अन्यथा तुमचा चेक क्लिअर होणार नाही. PNB ग्राहकांचा खात्यात पैसे नसल्यामुळे तुमचा व्यवहार फेल झाला तर तुम्हाला यासाठी 250 रुपये दंड आकारला जाईल. ICICI ग्राहकांनी क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरल्यास विलंब शुल्क वाढवण्यात आले आहे.
रत्नागिरी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवाशी वाहतुक सुरू व्हावी, याकरिता पायाभूत सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. याअनुषंगाने विमानतळाच्या परिसरातील विकास कामांचे सुनियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. रत्नागिरी विमानतळ विकासाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. कोविड १९ मुळे शाळा तिथं उपकेंद्र करण्यात येईल. एका वर्गात जास्तीत जास्त २५ विद्यार्थी बसतील अशी व्यवस्था असेल. सोशल डिस्टन्सिंगसाठी झिगझॅग पद्धतीने विद्यार्थ्यांना बसवले जाईल. ७० ते ८० गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून ५० ते ६० गुणांच्या पेपरला १५ मिनिटं अधिक वेळ दिला जाईल. यंदा बहिस्थ शिक्षक परीक्षक म्हणून न नेमता शाळेतील शिक्षक परीक्षक म्हणून काम पाहतील. परिक्षेसाठी लस घेणे बंधनकारक आहे.
0 टिप्पण्या