Subscribe Us

नवेपर्व न्यूज बुलेटीन 7 फेब्रुवारी 2022

 

भाजप नेते किरीट सोमय्या उद्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेणार, किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात एका शिवसैनिकाला अटक (kirit somayya)


राज्यात आज दिवसभरात ६ हजार ४३६ नवे कोरोनाबाधित आढळले असून २४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १८ हजार ४२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६ हजार ५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ( corona )


मुंबईत गेल्या २४ तासांत ३५६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ०५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत ५ हजार १३९ सक्रिय रुग्ण आहेत.


'महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा'च्या परीक्षेत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी अर्चना महेश पंजाबी हिने प्रावीण्य मिळवले आहे. ती राज्यातून पाचवी आली असून 'औषधशास्त्र' विषयात राज्यातून प्रथम येत सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे.


राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे. येत्या दोन दिवसांत समितीचा अहवाल येणे अपेक्षित असून त्यानंतरच एसटीच्या विलीनीकरणाबाबत पुढचे पाऊल उचलणे शक्य होईल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केले.


ठाण्यात शिवसैनिकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना अशाप्रकारची बॅनरबाजी होत असल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट भागात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले बॅनर लावले आहेत. येत्या 9 फेब्रुवारी रोजी मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या