जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वडाळी दिगर शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक योगेश काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश शिनगारे होते.कार्यक्रम प्रसंगी गावातील पालक कैलास बनकर,राहुल शिनगारे तसेच सागर मोरे,पवन बजारे,कृष्णा सावळे हे उपस्थित होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.आपल्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक योगेश काळे यांनी सांगितले की,शिवरायांनी आपल्या चतुर,चाणाक्ष बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील अनेक बलाढ्य शत्रूंना म्हणजेच अफजल खान,औरंगजेब,शाहिस्तेखान अशा अनेक शत्रूना हरवून टाकले आणि जिजाऊ मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले.छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले.विद्यार्थ्यांनी माहिती समजून घेतली.उपशिक्षक संदिप पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर निलेश भामरे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या