Subscribe Us

पिंगळवाडे येथे "जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियानाचा उत्साहात शुभारंभ

 


         आज 3 जाने.2022 रोजी *क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती* चे औचित्य साधून जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे येथे *"जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा"* या अभियानाचा शुभारंभ सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करुन करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाईं यांच्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.कल्पना पारधी, शाळेतील उपशिक्षिका श्रीम.वंदना सोनवणे व अंगणवाडी सेविका श्रीम.जयश्री पाटील या तिन्ही महिला भगिनींचा मुख्याध्यापक श्री.दत्तात्रय सोनवणे यांनी भेटवस्तू देऊन सन्मान केला. 
       बालिका दिनाचे औचित्य साधून सा.फु.द.पा.योजनेंतर्गत शाळेतील इ.3 री ची विद्यार्थीनी कु.पदमावती संजय कोळी हिस तिच्या पालकांसमवेत ₹ 360/- चा धनादेश शा.व्य.स.अध्यक्षा सौ.कल्पना पारधी यांचे शुभहस्ते देण्यात आला. यावेळी इ.3 री ची विद्यार्थीनी कु.जान्हवी पाटील हिने सावित्रीमाईंची वेशभुषा करुन 'मी सावित्री बोलतेय' हे स्वगत सादर केले. तसेच शाळेतील इतर विद्यार्थी व शिक्षक यांनीही आपल्या भाषणांतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी महती स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रविण पाटील यांनी केले तर आभार श्री.रविंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमास शा.व्य.अध्यक्षा सौ.कल्पना पारधी, मुख्याध्यापक श्री.दत्तात्रय सोनवणे, पदवीधर शिक्षक श्री.प्रविण पाटील, उपशिक्षक श्री.रविंद्र पाटील, उपशिक्षिका श्रीम.वंदना सोनवणे, अंगणवाडी सेविका श्रीम.जयश्री पाटील, पालक श्री.संजय कोळी व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या