Subscribe Us

जि.प.पिंगळवाडे शाळेच्या मयूरी पाटील चे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

 


अमळनेर: "जि.प.उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे शाळेची विद्यार्थीनी मयुरी किरण पाटील या विद्यार्थीनीची इ.५ वी पुर्व उच्च प्राथमिक (PUP) शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत निवड झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे."

         १२ ऑगस्ट २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे पुणे द्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल २४ नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला होता. परंतु अंतिम निकाल दिनांक ०७ जानेवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

       त्यामध्ये अमळनेर तालुक्यातील जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे शाळेतील विद्यार्थीनी मयुरी किरण पाटील हिने जिल्ह्यातील ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले असून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. तिला मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, शिक्षक प्रविण पाटील, रविंद्र पाटील, वंदना सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
       तिच्या या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, शिक्षणविस्तार अधिकारी पी.डी.धनगर, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंके, निवृत्त प्रांताधिकारी भागवत सैंदाणे, निवृत्त उपअभियंता डी.पी.पाटील, पिंगळवाडे गावच्या सरपंच मंगला देशमुख, उपसरपंच अतुल पाटील, पोलिस पाटील गजेंद्र पाटील, शा.व्य.समिती अध्यक्षा कल्पना पारधी, उपाध्यक्ष समाधान पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
       मयुरीच्या या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या