अमळनेर: आज 3 जानेवारी 2022 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती लोकमान्य विद्यालय अमळनेर येथे उत्साहात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यशाळेचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोहर महाजन आणि जितेंद्र चौधरी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र चौधरी यांनी केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोहर महाजन यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. तसेच आजच्या सावित्रीच्या लेकींनी कशाप्रकारे त्यांच्या आदर्श घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपले विचार व्यक्त केले आणि "जिजाऊ ते सावित्रीबाई सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" या अभियानाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक विजय सुर्यवंशी यांनी तर आभार मधुकर सोनार यांनी मानले. याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या