प्रतिनिधी:- सोलापूर
रमाबाई आंबेडकर आश्रम शाळा , निंबर्गी शाळेत आद्य शिक्षिका , मुख्याध्यापिका , स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेश हसापुरे होते , तर प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक अमित करपे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व सावित्री वंदनेनी झाली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बलिकांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना पोलिस उपनिरीक्षक अमित करपे म्हणाले , सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्यावरच राष्ट्राच्या अनेक पिढ्या स्वयंपूर्ण होऊन राष्ट्र उभारणीसाठी योगदान देत आहेत. अनेक मान्यवरांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षणापासून वंचित असलेल्या प्रत्येकासाठी ही शाळा उल्लेखनीय कार्य करेल हा विश्वास भारत बिराजदार यांनी व्यक्त केला. तर अध्यक्षीय भाषणात बोलताना सुरेश हसापुरे म्हणाले की, दृढ आत्मविश्र्वास व निर्धार यातून सावित्री ज्योतिबा यांनी अशक्य ते शक्य केले , त्यांचा हा गुण आत्मसात करायला हवा. येथे 1ली ते 10 वी एकत्र शिकण्याची सोय असून विविध उपक्रमातून शिक्षण हा उद्देश निश्चितच चांगला आहे. त्याबद्दल संस्था, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक बाळासाहेब वाघ यांनी केले. कार्यक्रमास भारत बिराजदार , भंडारकवठे केंद्राचे केंद्रप्रमुख बाबुराव कोळी, तिपन्ना कमळे, डायटचे हेमा शिंदे, सिद्धेश्वर शुगर फॅक्टरीचे नूतन संचालक प्रमोद बिराजदार, राजशेखर बिराजदार, पोलीस पाटील सिद्धाराम बिराजदार , माजी पोलीस पाटील शंकर पाटील, गंगाधर बिराजदार, जगदेव ककमारे, राम कादे, यदा दुपारगुडे, अंगणवाडी सेविका बाई वाघमारे, शंकर माळगे, आप्पासाहेब कोळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत खुपसंगी, सुरेश पाटोळे, सिद्धाराम माशाळे , बाबा शेख,स्मार्ट महाराष्ट्राचे योगेश वाघ, सलगर, भंडारकवठेचे पंचायत समिती माजी सदस्य विठ्ठल पाटील, माजी सरपंच धोंडाप्पा कमळे, मोतीराम जाधव, मुख्याध्यापिका प्रतिभा जाधव व शिक्षक वृंद , ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. सिध्दाराम वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले . पूजा काटकर यांनी सूत्रसंचालन केले.
0 टिप्पण्या