Subscribe Us

जिल्हा परिषद शाळा उमर्दे बु. येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा

 

विसरवाडी: आज दिनांक ०९ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा उमर्दे बु. येथे जागतिक दिव्यांग दिन सप्ताह ०३ डिसेंबर ते ९ डिसेंबर अंतर्गत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पिंपळोद केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थी, त्यांचे पालक वर्गशिक्षक यांचा श्रीफळ, पुष्प देवून सत्कार करण्यात आला. उपस्थित दिव्यांग विद्यार्थी यांचे वेगवेगळे खेळ घेण्यात आले व प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आलीत. दिव्यांग विद्यार्थी यांनी त्यांची मनोगत व्यक्त केलीत. दिव्यांग विद्यार्थीनी लक्ष्मी राठोड ही दोन्ही डोळ्यांनी पूर्णत: अंध असून तिने सादर केलेल्या इशस्तवन ने सर्व उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. लक्ष्मी ने सादर केलेले तिचे छोटेसे मनोगत हे देखील सर्वांचे मन हलवून टाकणारे होते. शाळेतील विद्यार्थी प्रज्ञेश आगळे याने दिव्यांग विद्यार्थी यांना शाळेतील सर्व विद्यार्थी कशा प्रकारे सामावून घेतात याबाबत आपले मत व्यक्त केले. यानंतर दिव्यांग शिक्षक आसिफ शेख यांची व दिव्यांग विद्यार्थी वर्गशिक्षक मनोज चौधरी, शारदा वाघ, संदिप रायते यांची विशेष मुलाखत श्रीकांत बच्छाव यांनी घेतली. ०३ डिसेंबर पासून उमर्दे शाळेत कथाकथन, वकृत्व, रांगोळी आदि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सदर बक्षीस वितरण आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

आजच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, विस्तार अधिकारी सचिन गोसावी, विस्तार अधिकारी शरद पाटील, केंद्रप्रमुख हिरामण वाघ यांनी दिली. प्रमुख मान्यवर यांनी दिव्यांग सप्ताह वर मार्गदर्शन केले. तालुका गटसाधन केंद्र येथील विषय साधन व्यक्ती रणजित राजपूत, महेंद्र पाटोळे, पानाजी वळवी, मनोज पाटील, श्रीकांत बच्छाव, ज्ञानेश्वर पाटील, प्रवीण धनुरे, जितेंद्र चौधरी, पौर्णिमा पाटील, प्रतिभा पाटील, निर्मला देशमुख, ग्रामसेवक ओमप्रकाश गावित, तलाठी संदिप शिंदे, डॉ.अनिल पाटील, डॉ.रुपाली इंदासराव, आरोग्य सेविका रीना निकुंभ, सुनीता गावित, आरोग्यसेवक किसन गावित, शाळेचे मुख्याध्यापक संदीप रायते, शिक्षक काशिनाथ पवार, भूषण चौधरी, रविंद्र चव्हाण, कृष्णा चिलकेवार, सुनील बोरसे, मालती गावित, शारदा वाघ केंद्रातील शिक्षक मनोज चौधरी, बालाजी लालोंडे, आसिफ शेख आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे संदीप रायते यांनी केले, सूत्रसंचालन काशिनाथ पवार यांनी तर आभार प्रदर्शन आनंदा पवार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या