Subscribe Us

मार्चमध्ये होणार १८ महापालिकांच्या निवडणुका

 

जळगाव: Covid-19 मुळे लांबलेल्या महाराष्ट्र राज्यातील विविध महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरु झाली आहे. नव्या माहितीनुसार, मुंबई व औरंगाबाद वगळता राज्यातील इतर 18 महापालिकांच्या निवडणुका मार्च 2022 मध्ये होतील.

राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित महापालिकांना 7 जानेवारीपर्यंत सुधारित आराखड्यानुसार आरक्षण निश्चिती, प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकसंख्या तसेच इतर आकडेवारीची माहिती पाठवण्याचे आदेश जारी केले आहेत. तथापि, या आदेशात औरंगाबाद आणि मुंबई महापालिकांबाबत कोणतेही निर्देश नाहीत. त्यामुळे या दोन महापालिकांच्या निवडणूक प्रक्रिया लांबल्याची चर्चा सुरू झाली आहे. मार्चमध्ये निवडणुका होणार असतील तर 1 फेब्रुवारीपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या महापालिकांमध्ये निवडणुकीची शक्यता !

कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर, नवी मुंबई, उल्हासनगर, सोलापूर, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे महापालिकेत मार्चमध्ये निवडणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या