Subscribe Us

सानेगुरुजी शैक्षणिक विचार मंचतर्फे गुणवंत शिक्षकांचा सत्कार

प्रेरणा देऊया.. प्रेरणा घेऊया...

हे ब्रीद वाक्य असलेल्या व सदोदित नवोपक्रम राबविणाऱ्या सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंच, शिवशाही फाउंडेशन व खान्देश साहित्य संघातर्फे विविध पुरस्कार प्राप्त व उपक्रमशील शिक्षक बंधू व भगिनींचा छोटेखानी सत्कार समारंभ "जीवनगौरव पुरस्कार" प्राप्त शिक्षक आदरणीय डी. ए. धनगर यांच्या निवासस्थानी पार पडला.

अमळनेर नगरी मुळातच शैक्षणिक वारसा लाभलेली नगरी आहे. आणि हा समृद्ध वारसा पुढे नेणाऱ्या सर्व उपक्रमशील शिक्षकांचा हा मेळा श्री डी ए धनगर यांच्या निवासस्थानी जमला होता. खरंतर प्रत्येक व्यक्ती उपक्रमशील व तुल्यबळ होती.

     •सत्कारमुर्ती शिक्षक बंधू-भगिनी•

श्री.डी.ए.धनगर सर (जीवन गौरव पुरस्कार)

श्री.निरंजन पेंढारे सर (गुणवंत शिक्षक पुरस्कार)

सौ.सुनिता पाटील मॅडम ('रेवती'हा काव्य संग्रह प्रकाशित)

श्री. दत्तात्रय सोनवणे सर(वोपा उल्लेखनीय कार्य)

श्री.चंद्रकांत देसले सर (वोपा उल्लेखनिय कार्य)

सौ.छाया इसे मॅडम (लोकशाही भोंडला बक्षिस).

   वरील सत्कारमूर्ती शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नियमित अग्रेसर असणाऱ्या आहेत. सत्कारार्थींबद्दल कवी व गझलाकार कुणाल पवार,केंद्रप्रमुख व मार्गदर्शिका मंगलाताईंनी विचार मांडले.सत्काराला उत्तर देतांना आदरणीय डी. ए.धनगर सर व उपक्रमशील शिक्षिका छाया इसे यांनी उपस्थितांचे सत्काराबद्दल आभार मानले.कवयित्री सौ.सुनीता पाटील यांनी अतिशय सुरेख अहिराणी कविता सादर केली. त्याचबरोबर गझलाकार कुणाल पवार यांनी ही एक गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली.सौ.रेखा मराठे मॅडम यांनी कथेचा 'अलक' प्रकार सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.सकाळ पत्रकार व उपक्रमशील शिक्षक उमेश काटे सर यांनी ऋणनिर्देश व्यक्त करतांना पुरस्कारप्राप्त शिक्षक बंधू-भगिनींकडून उत्तरोत्तर चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील सरांनी सूत्रसंचालन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या