Subscribe Us

कोरोनाचे वाढते आकडे धडकी भरवणारे- मा.उपमुख्यमंत्री अजित पवार

 


मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. गेल्या सहा दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णवाढीनं कमालीचा वेग पकडला आहे. कोरोनाचा नवा विषाणू पुन्हा एकदा गुणाकार करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आकडेवारीतून पाहायला मिळालंय.
एकीकडे रुग्ण वाढत आहे तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागेल का अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी लॉकडानऊबाबत भाष्य केलं आहे.

तिसरी लाट म्हणून सरकार याकडे पाहत आहे. तज्ज्ञांचं मत आहे की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे गरज पडली तर निर्बंध कडक केले जातील, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं.
कोरोनाचे वाढते आकडे धडकी भरवणारे असून मंगळवारी राज्यात 2 हजार 172 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. ही आकडेवारी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. राज्यात गेल्या कित्येक महिन्यातली ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या