Subscribe Us

अमळनेर तालुक्यातील दोन जि.प.शिक्षकांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार


              अमळनेर तालुक्यातील जि.प.पिंगळवाडे शाळेचे शिक्षक दत्तात्रय सोनवणे व जि.प.कलाली शाळेचे शिक्षक चंद्रकांत देसले या दोन शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जि.प.जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, प्राथ. शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्य. शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व वोपा संस्थेचे संस्थापक प्रफुल्ल शशिकांत यांची प्रमुख उपस्थिती होती.

             मागील दीड वर्षापासून कोविडमुळे शाळा पुर्णपणे बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि शिक्षणाची गोडी वाढावी म्हणून मराठीसह आपल्या बोलीभाषा (अहिराणी) तून अभ्यासक्रमातील विविध घटक दर्जेदार व रंजक पध्दतीने तयार करण्यासाठी दोन्ही शिक्षकांनी जिल्हास्तरीय कार्यशाळेत सक्रिय सहभाग नोंदवून अमळनेर तालुक्यासाठी दिलेले उद्दिष्ट तालुकास्तरावर शिक्षणविस्तार अधिकारी पी.डी.धनगर यांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळा घेऊन अर्चना बागुल (सारबेटे), जयश्री पवार (जळोद), जिजाबराव पाटील (गंगापुरी), मनिषा पाटील (मठगव्हाण), छाया इसे (मठगव्हाण), मनिषा पाटील (सडावण), अशोक पाटील (शिरुड), मच्छिंद्र पाटील (खापरखेडा), कल्पना साळुंखे (ढेकुसिम), कविता पाटील (जैतपिर), अनिल धनुरे (शहापूर) व संदीप सूर्यवंशी या उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षकांसह शाळेतील विद्यार्थी, सहकारी मित्र व परिवारातील सदस्य यांचे मदतीने व्हिडीओ, पीपीट़ी, ऑडीओ, चित्रे, GIF इमेजेस, गुगल फार्म, वर्कशीट इ.विविध तंत्रांचा सुयोग्य वापर करुन आकर्षक व पाठ्यपुस्तकापलीकडे जाऊन अधिक माहिती देणारे पाठ तयार केले आहेत. 

             जि.प.जळगाव व वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन (वोपा) यांच्या एकत्रित पुढाकारातून सुरु झालेल्या 'व्ही-स्कूल फ्री' या ऍपमार्फत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य निर्माण करुन राज्याच्या शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या जिल्हाभरातील मराठी, सेमी इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचा जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जिल्हा मुख्य प्रशासन, जि.प.जळगाव व वोपा परिवार,पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात "उल्लेखनीय कामगिरी सन्मानपत्र" देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये अमळनेर तालुक्यातील या 2 जि.प.शिक्षकांचा समावेश आहे.

या दोन्ही शिक्षकांनी यापुर्वीही जिल्हास्तर गणित संबोध कार्यशाळेतून जिल्ह्यातील सुमारे 2 हजार प्राथ.शिक्षकांना प्रशिक्षण देऊन सुलभक म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. त्यामुळे दत्तात्रय सोनवणे व चंद्रकांत देसले या दोन्ही गुणी व उपक्रमशिल शिक्षकांच्या यशाचे अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, शिक्षणविस्तार अधिकारी पी.डी.धनगर, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंके, शरद सोनवणे, अशोक सोनवणे, रविंद्र पाटील यांनी कौतुक केले आहे. तसेच त्यांच्या या यशाबद्दल अमळनेर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमी यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या