जि.प.प्राथमिक शाळा शिरुड येथे बालक हक्क दिवस उत्साहात साजरा
शिरूडकर कै.भगवान वामन पाटील यांचे सुपुत्र व शाळेचे माजी विद्यार्थी धनराज दादा व विलासभाऊ हेअत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेवून पुणे येथे व्यवसायात स्थिर स्थावर होताना एक ऋण निर्देश व सामाजिक भान ठेवून दातृत्व भावनेने गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात मागील सहा वर्षांपासून देत आहेत.एक लाखाच्या वर मदत त्यांनी दिली आहे. दर वर्षी मुलांचा वाढदिवस शाळेत देणगी व वस्तू देवून साजरा करतात. विविध प्रकारच्या शालेय उपक्रमात सढळ आर्थिक मदत करतात.आज बालक हक्क दिवस निमित्ताने शाळेतील सर्व मुलांना त्यांच्या 10000रू देणगीतून पाट्या व पेन्सिल तसेच दिवाळी मिठाई व फराळ याचे वाटप शालेय समिती व शिक्षक वृंदांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी SMC पदाधिकारी व शिक्षक यांनी बालकांना उद्बोधन केले.
0 टिप्पण्या