जि.प.पिंगळवाडे येथे शाळेचा 83 वा वाढदिवस उत्साहात संपन्न!
आज दि.1-11-2021 रोजी पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेचा स्थापना दिनांक 1 नोव्हे.1938 नुसार 83 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल शाळेचा 83 वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम उपस्थितांचे छात्रप्रबोधन दिवाळी अंक भेट देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक श्री.दत्तात्रय सोनवणे यांनी "वाढदिवस शाळेचा" या नाविण्यपुर्ण उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा सरपंच मा.ताईसोा.मंगला देशमुख यांचे हस्ते केक कापून शाळेचा 83 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी सामुहिक बर्थडे गीत गाऊन आनंद व्यक्त केला. वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित शाळेतून नुकताच इ.7 वी उत्तीर्ण विद्यार्थी चि.हितेश पाटील याचा वाढदिवस असल्याने त्याचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. अशा या आनंदमय वातावरणात सरपंचताईंनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्वत: केक भरवला. तसेच शाळेतील शिक्षकस्टाफ तर्फे दिवाळी सणाचा प्रथम दिवस वसूबारस व शाळेच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून बिस्किट पुडे वाटण्यात आले. तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून मा.मंगलाताई देशमुख यांचे हस्ते शाळेच्या परसबागेत शोभिवंत फुलझाडे लावण्यात आली.
कार्यक्रमास पिंगळवाडे गावाचे प्रथम नागरिक तथा सरपंच मा.ताईसोा.श्रीम.मंगला देशमुख, उपसरपंच मा.दादासोा.श्री.अतुल पाटील, ग्रा.पं.सदस्य मा.न्हानभाऊसोा.श्री.देविदास देशमुख, ग्रामसेवक मा.भाऊसोा.श्री.विलास पाटील, पालक दादासोा.श्री.राजू मोरे, शिक्षणप्रेमी दादासोा.श्री.योगेश पाटील, स्वयंसेवक आप्पासोा.श्री.विक्रम शेलार, शाळेचे मुख्याध्यापक श्री.दत्तात्रय सोनवणे, पदवीधर शिक्षक श्री.प्रविण पाटील, उपशिक्षक श्री.रविंद्र पाटील, उपशिक्षिका श्रीम.वंदना सोनवणे व बालगोपाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रविण पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन श्री.रविंद्र पाटील यांनी केले.
0 टिप्पण्या