भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रास 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान भारतास अर्पण केले. त्यानिमित्ताने आपण संविधान दिन सादर करीत आहोत. दिनांक 23 नोव्हेंबर 2021 ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत "माझे संविधान माझा अभिमान" हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड सोशल सर्व्हिसेस जळगाव संचलित उत्कर्ष मतिमंद विद्यालयात आज संविधान दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यात सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त पालक व कर्मचाऱ्यांसमवेत माहिती सांगण्यात आली. तदनंतर विद्यार्थ्यांकडून रांगोळी रंगवण्याची स्पर्धा व चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. तसेच पालकांशी ऑनलाइन पद्धतीने संपर्क साधून आपल्या संविधान उद्देशिकेचे वाचन करून घेण्यात आले. सदरील कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
0 टिप्पण्या