भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान अर्पण केले. म्हणून आपण संविधान दिन सादर करीत असतो. त्यानिमित्ताने लोकमान्य विद्यालयात आज संविधान दिवस साजरा करण्यात आला. सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे आणि जेष्ठ शिक्षक राजेंद्र निकुंभ व मनोहर महाजन यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच संविधान उद्देशिका पूजन करण्यात आले. तद्नंतर विद्यार्थ्यांकडून संविधान उद्देशिकेचे वाचन करून घेण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक यांनी मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक जे.के चौधरी यांनी केले. सदरील कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
0 टिप्पण्या