Subscribe Us

कवी कट्टयासाठी संजय धोंगडे यांच्या कवितेची निवड

 कवी कट्टयासाठी संजय धोंगडे यांच्या कवितेची निवड

उस्मानाबाद : नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उस्मानाबाद येथील कवी संजय लिंबराज  धोंगडे  यांच्या *उजेड आनंदाचा* या कवितेची निवड करण्यात आली असून दि.4 डिसेंबर रोजी कविकट्टयामध्ये कविता सादरीकरणासाठी उपस्थित राहणेसाठी अलका कुलकर्णी , संपर्क समिती कविकट्टा 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक यांनी कळविले आहे.

          यापूर्वी उस्मानाबाद येथे झालेल्या 93 व्या साहित्य संमेलनात सुद्धा संजय धोंगडे यांनी कविकट्टा समितीमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत *आठवण* ही कविता सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली होती.आतापर्यंत त्यांनी अनेक राज्य , जिल्हास्तरीय कविसंमेलनातही कवितांचे सादरीकरण केले आहे. शाळेतील मुलांचा त्यांनी *चिमुकली काव्यफुले* हा बालकविता संग्रह प्रकाशित केलेला  आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या