मित्रांनो महाज्योती एक संस्था आहे या संस्थेला महाराष्ट्र सरकारचा ला सपोर्ट आहे या संस्थेअंतर्गत इयत्ता 10 वी पास विद्यार्थ्यांना फ्री मध्ये तुम्हाला टॅबलेट देण्यात येणार आहेत, तसेच त्यासोबत इंटरनेट आणि काही पुस्तकेसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला 10 वी पास असणे गरजेचे आहे. 2021 मध्ये ज्यांची ज्यांची दहावी पास आहे आणि ज्यांनी 11 वी सायन्सला अॅडमिशन घेतले आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे.
• यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे ?
• सगळ्यात महत्त्वाचं पात्रता काय आहे ?
• कोणते विद्यार्थी पात्र आहेत ?
• लाभ काय काय आहे ?
• यामध्ये कागदपत्रे तुम्हाला कोणती लागणार ?
सर्व माहिती पाहणार आहोत !
मित्रांनो तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की हे टॅबलेट पुस्तके आणि इंटरनेटची सुविधा आम्हाला का देताय ? तर मित्रांनो 12 वी नंतर जेव्हा तुमची 12 वी पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला MHT-CET, इंजिनिअरिंग, मेडिकलसाठी, एग्रीकल्चरसाठी, CET परीक्षा असतात. MHT-CET असेल NEET असेल JEE असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठे कोचिंग क्लासेस वगैरे लावायची गरज नाही हे तुम्हाला फ्री मध्ये शिकवणार आहेत आणि ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला कोचिंग क्लासेस घेतील आणि त्यात क्लासेस साठी तुम्हाला टॅबलेट वापरायचा आहे.
• यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे अर्ज नक्की कोण करू शकतो? तर मित्रांनो यामध्ये तीन पॉइंट तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे.
1) तुमची आता दहावी पास असणे गरजेचे आहे आणि तुम्ही अकरावी सायन्सला अॅडमिशन घेतलेले पाहिजे.
2) शहरी भागातील विद्यार्थी असतील त्यांना 70% पेक्षा जास्त गुण पाहिजेत.
3) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% पेक्षा जास्त गुण पाहिजेत.
4) OBC, VJNT, SBC या कॅटेगरीतील विद्यार्थीच अर्ज करु शकतात.
• या योजनेचे लाभ कोणते ?
1) पहिला लाभ म्हणजे तुम्हाला टॅबलेट + त्यासोबत इंटरनेट सुद्धा 6 GB प्रत्येक दिवसाला म्हणजेच 6 GB इंटरनेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे.
2) दुसरा लाभ म्हणजे यामध्ये तुम्हाला पुस्तकेसुद्धा दिली जाणार आहेत.
3) तिसरा म्हणजे तुम्हाला यामध्ये कोचिंग क्लासेस फ्री मध्ये राहणार आहेत.
• कागदपत्रे कोणकोणती तयारी ठेवायची ?
1) शाळा सोडल्याचा दाखला
2) 10 वी चे मार्कशीट
3) जात प्रमाणपत्र (कास्ट सर्टिफिकेट)
4) नॉन क्रिमिलियर
5) अकरावी सायन्सला ॲडमिशन घेतलेल्याचा पुरावा
6) फोटो, सही, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी इ.
• फाॅर्म कसा भरावा
सर्व प्रथम आपणांस https://mahajyoti.org.in या वेबसाईटवर जायचे आहे.
त्यानंतर उपक्रमातील MH-CET/JEE/NEET या परिक्षांच्या २०२३ करिता ऑनलाईन पूर्व तयारीसाठी नोंदणी याखालील Read more यावर क्लिक करा.
त्यानंतर पुन्हा एक पेज ओपन होईल त्यातील Click here for Ragistration (नोंदणी अर्ज) यावर क्लिक करा.
त्यानंतर खाली दाखवलेला फाॅर्म आपल्यासमोर येईल या फाॅर्ममध्ये आपली अचूक माहिती भरावी.
संपूर्ण फाॅर्म भरल्यानंतर SUBMIT करा नंतर Print this form या बटणावर क्लिक करुन फाॅर्म प्रिंट करुन घ्या.
हा फार्म सबमिट केल्यानंतर पुढची प्रक्रिया असेल त्यात तुम्हाला महाज्योती संस्थेतर्फे संपर्क केला जाईल आणि पुढील प्रक्रियेची तुम्हाला माहिती देण्यात येईल.
तर मित्रांनो अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही मोफत टॅबलेट मिळवण्याचा लाभ घेऊ शकता.
0 टिप्पण्या