आज ५८० वर्षातील सर्वात मोठे चंद्रग्रहण !
आज शुक्रवार 19 नोव्हेंबर 2021 रोजी कार्तिक शुक्ल पौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण होत आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दिवसा होणार आहे त्यामुळे ते भारतात दिसणार नाही.
अरुणाचल प्रदेशातील फक्त काही डोंगराळ भागात एक मिनिटापेक्षा कमी काळ ग्रहण दिसेल. नासाच्या वेबसाइटनुसार, हे आंशिक चंद्रग्रहण तीन तास अठ्ठावीस मिनिटे चालणार आहे. जे 580 वर्षातील सर्वात मोठे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार ग्रहण दुपारी 12 वाजून 48 मिनिटांनी सुरू होईल आणि चार वाजून सतरा मिनिटांनी संपेल.
0 टिप्पण्या