भारताने रचला इतिहास; शंभर कोटी नागरिकांचं झालं लसीकरण, आता लवकरच कोरोनाला पराभूत करु- मा.पंतप्रधान
नवी दिल्ली : देशात कोरोनाच शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल देशातील नागरिकांचं अभिनंदन केले आहे. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी गुरुवारी सांगितले की, हे यश भारताचे आहे, भारतातील प्रत्येक नागरिकाचे आहे. ते म्हणाले, 'मी देशातील सर्व लस उत्पादक कंपन्या, लस वाहतुकीमध्ये गुंतलेले कामगार, आरोग्य क्षेत्रातील कर्माचारी या सर्वांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो. आज, 21 ऑक्टोबर 2021 चा हा दिवस इतिहासात नोंदविण्यात आला आहे. भारताने काही वेळापूर्वी शंभर कोटी डोसचा आकडा पार केला आहे. भारताने आज इतिहास रचला आहे. भारताने अवघ्या नऊ महिन्यांत ही कामगिरी केली आहे.
'कोरोनाविरुद्ध एक मजबूत संरक्षणात्मक ढाल'
ते म्हणाले की, 100 वर्षातील सर्वात मोठ्या साथीचा सामना करण्यासाठी, देशाकडे आता 100 कोटी लसींच्या डोसची मजबूत संरक्षणात्मक ढाल आहे. आपल्या एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, 'आपण 130 कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेचा, भारतीय उद्योग आणि विज्ञानाच्या विजयाचे साक्षीदार आहोत. 100 कोटी डोसचा आकडा पार केल्याबद्दल मी राष्ट्राचे अभिनंदन करतो. हे रेकॉर्ड बनवण्यात योगदान दिलेल्या डॉक्टर, नर्सेससह सर्व लोकांचे मी आभार मानतो.
0 टिप्पण्या