Subscribe Us

TET परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल- परीक्षा परिषद

TET परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल- परीक्षा परिषद


परीक्षा परिषदेच्या वतीने "महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१"चे आयोजन दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्याचे जाहिर करण्यात आले होते. तथापि सदर दिनांकास केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचेही आयोजन करण्यात आलेले होते. त्यामुळे एकाच दिनांकास परीक्षा आल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये. ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात आला होता. तेव्हा शिक्षक पात्रता परीक्षेच्या दिनांकात बदल करुन दि.१०/१०/२०२१ ऐवजी ३१/१०/२०२१ रोजी आयोजन करण्याचे परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आले. 

त्यानंतर आता पुन्हा परीक्षा परिषदेच्या वतीने "महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१"चे आयोजन दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले होते. तथापि सदर दिनांकास देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुका आहे. ही बाब विचारात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ च्या परीक्षा दिनांकात पुन्हा एकदा बदल करण्यात येत असुन सदर परीक्षा दि.३०/१०/२०२१ ऐवजी २१/११/२०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदर बदलाची संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी. असे आवाहन काल परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा एकदा परीक्षेच्या दिनांकात बदल झाल्यामुळे परीक्षार्थींच्या पुन्हा गोंधळ उडाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या