Subscribe Us

ऑनलाइन शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न 

ऑनलाइन शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न 

(शिक्षणाधिकारी कार्यालय अमरावती व राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद अमरावती यांचा संयुक्त उपक्रम)

अमरावती (जि.वा):- भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय,नवी दिल्ली यांच्या कार्यक्रमांतर्गत 29 व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.या उपक्रमांतर्गत 10 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून त्यांना वैज्ञानिक संशोधन पद्धतीचे ज्ञान व्हावे या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातात.सदर परिषदेचे आयोजन जिल्हा,विभाग,राज्य आणि राष्ट्रीय अशा विविध पातळ्यांवर करण्यात येते.सन 2020-21 व 2021-22 या दोन शैक्षणिक वर्षांकरिता बाल विज्ञान परिषदेचा मुख्य विषय *शाश्वत जीवनासाठी विज्ञान* असा असून या अंतर्गत पाच उपविषय ठरविण्यात आले आहेत.या अंतर्गत जिल्हा स्तरीय बालविज्ञान परिषद 20 ते 30 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातून 266 प्रकल्पांची नोंदणी झालेली आहे.हे प्रकल्प विद्यार्थ्यांना त्यांच्या विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावयाचे असल्यामुळे नोंदणी केलेल्या विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा ऑनलाइन पद्धतीने मंगळवार दिनांक 19 ऑक्टोबर 2021रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात आली.कार्यशाळेचे प्रास्ताविक राष्ट्रीय बालविज्ञान परिषद अमरावतीचे जिल्हा समन्वयक श्री दत्तात्रय देशमुख यांनी केले. या कार्यशाळेला माननीय श्री चंद्रशेखर कोहळे सर शिक्षण विस्तार अधिकारी,शिक्षणाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद,अमरावती यांची प्रमुख उपस्थिती लाभली.त्यांनी सुद्धा आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. अमरावती जिल्ह्यासाठी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे परीक्षक म्हणून निवड झालेल्या डॉ.शीतल भड मॅडम या सुद्धा कार्यशाळेला उपस्थित होत्या व त्यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी केलेल्या संशोधनाबद्दल व त्याचे पेटंट मिळाल्याबद्दल त्यांचे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेतर्फे अभिनंदन करण्यात आले.मा.डॉ.एल.पी. नागपूरकर सर विभाग प्रमुख, एम.बी.पटेल महाविद्यालय,साकोली हे आजच्या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक होते.त्यांनी प्रकल्प कसा तयार करावा व समरी कशी लिहावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले व विज्ञान शिक्षकांनी विचारलेल्या शंकांचे समाधान केले.या कार्यशाळेला अमरावती जिल्ह्यातील 50 विज्ञान शिक्षक उपस्थित होते.या कार्यशाळेचे आयोजन,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद अमरावतीचे जिल्हा शैक्षणिक समन्वयक श्री अतुल ठाकरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या