तुमची कोरोना काॅलरट्यून बंद करायचीय का?
'नमस्कार, हमारा देश और पुरा विश्व आज कोविड 19 से...' अमिताभ बच्चन किंवा इतर उद्घोषकांच्या आवाजाने आपल्या प्रत्येकाचा कॉल सुरू होतो. तब्बल दीड वर्ष अशी कॉलर ट्यून आपण ऐकतो आहे. ही काॅलरट्यून प्रत्येक अगदी फ्री अॅक्टीवेट करण्यात आली होती. त्यामुळे आता सर्वांनाच या कॉलरट्यूनमुळे इरिटेशन होत आहे. यापासून सुटका करून घ्यायची असेल तर काही पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. Airtel, Jio आणि BSNL ग्राहकांसाठी कोरोनाची कॉलरट्यून कॉलर ट्यून थांबविण्यासाठी SMS आणि मिस्डकॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. Airtel ग्राहकांनी मोबाईलच्या किपॅडवर *646*224# असा क्रमांक डायल करून त्यानंतर एक अंक प्रेस करावा. तर जिओ ग्राहकांनी STOP हा संदेश टाइप करून 155223 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर येणाऱ्या संदेशाच्या आधारे पुढील कार्यवाही करावी. तर भारत संचार निगम लिमिटेडच्या ग्राहकांनी UNSUB हा संदेश 56700 किंवा 56799 या क्रमांकावर पाठवावा.
0 टिप्पण्या