Subscribe Us

जगातील सुप्रसिद्ध सोशल मिडीया फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम ठप्प

जगातील सुप्रसिद्ध सोशल मिडीया फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम ठप्प

जगातील सुप्रसिद्ध सोशल मिडीया फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम अनेक भागांमध्ये काल, सोमवारी रात्री अचानक काम ठप्प झाले. 'सॉरी, काही तरी अडचण आहे. आम्ही काम करत आहोत. आम्ही लवकरात लवकर ही तांत्रिक अडचण दूर करू,' असे फेसबुकच्या वेबसाईटने स्पष्ट केले.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम रात्री 9 वाजेपासून अ‍ॅसेस होत नसल्याची ट्विट अनेकांनी ट्विटरवर केल्या. वेबसाईट डाऊनडिटेक्टर डॉट कॉम जी वेबसेवा ट्रॅक करते, त्यांनीही आमच्याकडे युजर्सच्या अनेक तक्रारी आल्याचे म्हटले आहे. या वेबसाईटवर 20 हजारांपेक्षा जास्त लोकांनी फेसबुक, इन्स्टाग्राम कार्यरत नसल्याच्या तक्रारी केल्या.

व्हॉट्सअ‍ॅप देखील १४ हजारांपेक्षा जास्त वापरकर्त्यांसाठी साठी डाऊन झाले होते. तर मेसेंजर्स ३ हजारपेक्षा जास्त वापरकर्त्यांसाठी डाऊन होते. काही तरी तांत्रिक कारणामुळे सोमवारी रात्री ९ वाजल्यापासून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम डाऊन झाले. फेसबुकवर करण्यात आलेल्या पोस्ट जात नव्हत्या तर काहींचे फेसबुक अॅप उघडत नव्हते. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवरील पोस्टही अपलोड होत नव्हत्या, मेसेज सेंड होत नव्हते. त्यामुळे सर्वांचा गोंधळ उडाला होता. अनेकांनी आपले व्हाॅट्सअॅप अॅप अनइस्टाॅल करुन पुन्हा इस्टाॅल केले, डेटा क्लियर केला, काहींनी तर थेट आपल्या इंटरनेट कनेक्शनवरच संशय घेतला. यापूर्वी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप १९ मार्च आणि ९ एप्रिल रोजी सुमारे ४५ मिनिटांसाठी बंद झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या