Subscribe Us

जागतिक टपाल दिनानिमित्त पत्र लेखन स्पर्धा संपन्न

जागतिक टपाल दिनानिमित्त पत्र लेखन स्पर्धा संपन्न

शिरुर प्रतिनिधी (लालासाहेब जाधव) आज जि.प.प्राथ.शाळा कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे जागतिक टपाल दिन ९ ऑक्टोबर निमित श्री लालासाहेब जाधव सर यांनी पाचवीच्या मुलांना पोस्टकार्ड वाटप करण्यात आले वरील विषयानुसार पत्र लेखन सराव घेऊन, पोस्टमन काकांना तसेच नातेवाईक यांना एक पत्र लिहिण्यास दिले, प्रथमच मुले पत्र लिहीत होते चेहऱ्यावर उत्सुकता पण होती. उपक्रमाचे कौतूक मुख्याध्यापक सुदाम लंघे केंद्रप्रमुख श्रीहरी पावसे व गट शिक्षणाधिकारी कळमकर साहेब यांनी केले, मोबाईल जमान्यात मुलांना पोस्टकार्ड व पत्र लेखन ओळख करून देणे गरजेचे आहे असे मुख्याध्यापक लंघे सर म्हणाले.

            या शैक्षणिक व राष्ट्रीय कार्यात सर्व मुलांनी सहभाग नोंदवण्यात आला पालकांनी मुलांना ५० पैशाचे पोस्ट कार्ड उपलब्ध करुन द्यावे.आपल्या काळातील पत्राचे अनुभव आपल्या पाल्यांना सांगून पत्राचे महत्त्व पटवून द्यावे. असे मनोगत श्री धनजंय गायकवाड प्रांत अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य यांनी केले .

पत्र ज्यांना पाठवायचे आहे त्यांचा संपुर्ण पत्ता पिन कोडसह लिहावे व आपला पत्ता कसे लिहावे. यांची संपूर्ण माहिती व तयारी श्री लालासाहेब जाधव सर यांनी करून घेतली.


        जागतिक टपाल दिन विशेष. ९ आँक्टोबर सदरील स्पर्धा टपाल विभागाचे व लोप पावत असलेल्या पोस्ट कार्डचे महत्व वाढावे म्हणून ठेवलेली होती मुलांना पत्र लेखन कला अवगत व्हावे. शालेय अभ्यासक्रमात पत्र लेखन हा घटक आहे याचा अभ्यास व्हावा. या हेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पत्र लेखनाचा अनुभव लहान मुलांना पहिल्यांदाच घेता यावा म्हणून जि.प.प्राथ.शाळा कोंढापुरी व राहूल दिघे ग्राहक पंचायत कार्यकर्ता याच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या