Subscribe Us

अमळनेर तालुक्यात कलाली शिवारात बिबट्याचा वावर?

अमळनेर तालुक्यात कलाली शिवारात बिबट्याचा वावर? 


अमळनेर: गुरुवारी रात्रीच्या सुमारास हिंस्त्र हल्ल्यात दोन जनावरे तीन रानडुक्कर ठार झाल्याची घटना कलाली येथे घडली. गुरूवारी दोन जनावरांसह तीन रानडुकरे ठार झाली आहेत. कलाली शिवारात गावातील गुरे चरण्यास जातात. मात्र यातील गजानन भादु पाटील यांची मालकीची गाय सायंकाळी परत नाही आली. यावेळी त्यांनी सकाळी गाईचा शोध घेतला असता शेतात ही गाय मृतावस्थेत व लचके तोडलेले दिसली. तर अधिक शोध घेतला असता किशोर कोळी यांची वासरे देखील मृतावस्थेत व लचके तोडलेले आढळले. याचबरोबर तीन रानडुकरांचा फडशा पाडलेला दिसला. गावालगत लेंढ्या नाल्याच्या जवळच्या शेतात ही गाय फरफटत नेली होती. तसेच यावेळी हिंस्त्र प्राण्याच्या पायाचे ठसे ही आढळून आले. यामुळे मालकांनी तातडीने ही बाब सेवानिवृत्त डीवायएसपी मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या कानावर घातली व पायाचे ठसे मागवून त्यांनी वनविभागाला माहिती दिली आहे.


त्यावरून वनविभागाने तातडीने दखल घेऊन लेंढ्या नाल्यात व जंगलात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. गावालगतच हिंस्त्र प्राण्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या