Subscribe Us

राज्यात पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता!

राज्यात पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता!

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनने राज्यातून परतीचा प्रवास सुरू केला. राज्यात येत्या शनिवारी आणि रविवारी विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात यावर्षी पावसानं दमदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव तयार झाल्याने राज्यात पाऊसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळं परतीच्या पावसानंतर राज्यात पुन्हा एकदा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या सर्व भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या